नंदुरबार l प्रतिनिधी

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या युवती सेनेतर्फे संवाद बैठक घेण्यात आली. या संवाद सभेतून शिवसेना व युवती सेनेच्या पदाधिकार्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले. या संवाद दौर्यातून युवती सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी व नंदुरबार जिल्हा युवती सेनेच्या विस्तारक कामिनी देवरे हे पदाधिकार्यांशी संवाद साधत आहेत.
उबाठा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्यकारीणी व सिनेट सदस्य सौ. शितलताई देवरुखकर शेठ यांच्या संकल्पनेतुन आ.आमश्याा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यात युवती संवाद सभा दौरा होत आहे.
या संवाद सभेत महाराष्ट्र राज्याच्या युवती सेनेच्या सहसचिव मालती वळवी, नंदुरबार जिल्ह्याच्या युवती सेनेच्या विस्तारक कामिनी देवरे हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 3 ऑक्टोंबरपासून शहादा येथून संवाद सभेला सुरुवात झाली आहे. शहादा येथे संवाद सभेला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी,
तालुकाप्रमुख राजेंद्र लोहार, उपजिल्हा संघटक मधुकर मिस्त्री, तालुका संघटक गणेश चित्रकथे, शहरप्रमुख अब्दुल कादिर, शहरप्रमुख सागर चौधरी, युवा उपजिल्हाधिकारी गोपाल भंडारी, युवा तालुका अधिकारी सुजित पावरा, माजी शहरप्रमुख सुरेश मोरे, दिलीप पाटील, मुरली वळवी, जयसिंग ठाकरे, जुलाल ठाकरे, पंडित माळी, अनिताबाई सुतार, कमलबाई ठाकरे, सुनीता वळवी आदी उपस्थित होते. यावेळी राज्य सहसचिव मालती वळवी, जिल्हा विस्तारक कामिनी देवरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. दि.6 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता धडगाव येथे व सायंकाळी पाच वाजता मोलगी येथे संवाद होईल. दि.7 ऑक्टोंबर रोजी 11 वाजता अक्कलकुवा येथे शिवसेना संपर्क कार्यालयात संवाद सभा होणार आहे.









