Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट,जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश

team by team
October 5, 2023
in राजकीय
0
आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट,जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश

नंदूरबार l प्रतिनिधी

 

राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व आठ आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.यावेळी नंदूरबार जिल्ह्यातील तीन आमदार उपस्थित होते.

 

 

या शिष्टमंडळामध्ये विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ, मंत्री श्री. आत्राम यांच्यासह आ.आमश्या पाडवी, सर्वश्री सुनील भुसारा, दौलत दरोडा, हिरामण खोसकर, शांताराम मोरे,नवापुरचे आमदार शिरीषकुमार नाईक, शिरपुरचे आ.काशिराम पावरा, डॉ.देवराम होळी, तळोदा चे आ.राजेश पाडवी व यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले.आ.के.सी.पाडवी याची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले.

 

 

 

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आमदारांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सकाळी भेट घेतल्यानंतर, विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सपत्नीक व आमदारांसह महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांच्यासोबत विक्रमगडचे (पालघर) आमदार सुनील भुसारा व इगतपुरी (नाशिक) आमदार हिरामण खोसकर होते. यावेळी परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

 

 

 

श्री. झिरवाळ म्हणाले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करून महत्त्वपूर्ण कार्य केले. श्री. चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या कार्यालयाचे महत्त्व आजही कायम आहे. या केंद्राच्या माध्यमातून राजधानीत महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम राबविणे, संस्कृतीचे संवर्धन करणे आदी महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. नवमाध्यमांच्या युगात परिचय केंद्रही आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे कार्य उत्तम प्रकारे करीत असल्याचे पाहून त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मिशन हायस्कुलला प्रथम पारितोषीक

Next Post

आश्वासना नंतर एकलव्य आदिवासी युवा संघटनाचे बेमुदत उपोषण स्थगित

Next Post
आश्वासना नंतर  एकलव्य आदिवासी युवा संघटनाचे बेमुदत उपोषण स्थगित

आश्वासना नंतर एकलव्य आदिवासी युवा संघटनाचे बेमुदत उपोषण स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add