नंदुरबार l प्रतिनिधी
७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे माजी सैनिक व वीर पत्नी यांचा गौरव सन्मान सत्कार समारंभ युवक जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.
यावेळी देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे सैनिक ज्ञानेश्वर पाटील यांच्या वीर पत्नी श्रीमती माधुरी पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व भारत मातेचे प्रतिमा पुजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव ॲड.दानीश पठान हे होते. प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते बिपीन पाटील,माजी सैनिक अरविंद पाटील,माजी भारतीय नेव्ही कॅप्टन रनयेवले ,राजेंद्र घुगे होते.
याप्रसंगी युवक प्रदेश सचिव ॲड.दानीश पठान,कौटिल्य फाऊंडेशन संचालक प्रविण पाटील, बिपीन पाटील,माजी सैनिक अरविंद पाटील,दिपांजली गावित यांनी मनोगत व्यक्त केले,व उपस्थित माजी सैनिक व वीर पत्नी यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक तालुकाध्यक्ष दिनेश सोनवणे यांनी केले यावेळी नरेंद्र जगताप, बाळासाहेब मोरे,सुनिल राजपुत,युवक शहराध्यक्ष मिलिंद जाधव,शहादा शहराध्यक्ष शोयब जकारीया, रुपेश जगताप,ऋषिकेश जगताप आदी पदाधिकारी कार्यकर्ते माजी सैनिक व महिला, युवक उपस्थित होते.