नंदुरबार l प्रतिनिधी
लोकनेते स्व.बटेसिंहभैय्या रघुवंशी यांच्या जयंती निमित्त छत्रपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, एस.एम.बी.टी हॉस्पिटल, घोटी (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात जिल्हाभरातून 940 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील होते.यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,आ.राजेश पाडवी,आ.शिरीषकुमार नाईक, उद्योजक मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, नगरसेवक किरण रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी आदी उपस्थित होते.
सर्व रोग निदान शिबिरात रुग्ण तपासणी, मधुमेह,हृदयविकार, उच्च रक्तदाब,कर्करोग,मेंदुसंबंधित आजार, मणके विकार,मूत्ररोग,अस्थिरोग, कान नाक घसा,जनरल सर्जरी,ह्रदयरोग,स्त्रीरोग,लहान मुलांचे आजार,किडणीसंदर्भात समस्या,पोटाचे विकार,या आजरांबाबत निदान व औषधोपचार करण्यात आले.
या शिबिरात डॉ रोशन भंडारी, डॉ योगेश्वर चौधरी,डॉ सुदीप पाटील, डॉ विशाल पाटील,डॉ भूषण आढाव, डॉ राजेश वळवी,डॉ विजय पटेल,डॉ चेतन सूर्यवंशी,डॉ विजय अग्रवाल,डॉ त्रंबक पटेल,डॉ जयवंत पाटील,डॉ सुरेंद्र पाटील,डॉ अबोली भंडारी,डॉ प्रीती सूर्यवंशी,डॉ चेतना जैन,डॉ शिल्पा भंडारी,डॉ हर्षवर्धन रघुवंशी,डॉ नेहा रघुवंशी
डॉ ध्वनिल टाळा, डॉ एशिता शाह,डॉ दुसेजा, डॉ ध्वनी शाह,श्वेता सोमाणी यांनी रुग्णांची तपासणी केली. यशस्वीतेसाठी शशिकांत हनुवते,सुनिल गिरासे,निवेदिता वसईकर व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








