नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील कचेरी ग्राउंडवर पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचे १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आयोजन केले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिना गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विक्रांत मोरे, गटनेते चारूदत्त कळवणकर, आनंद माळी, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, नीलेश पाडवी आदी उपस्थित राहतील. उपस्थितीचे आवाहन केतन रघुवंशी यांनी केले आहे.








