Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदरंग-२०२३ शासकीय कृषि महाविद्यालयात वार्षिक पारीतोषिक वितरण

team by team
June 17, 2023
in Uncategorized
0
नंदरंग-२०२३ शासकीय कृषि महाविद्यालयात वार्षिक पारीतोषिक वितरण
नंदूरबार l प्रतिनिधी
शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम: नंदरंग- २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे (भा.प्र.से.) उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ. यु. बी. होले  होते.
   कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री.गावडे म्हणाले की, कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीपूरक व्यवसाय वाढीसाठी करावा. कृषि क्षेत्रातील विविध संशोधनाचा फायदा पिक उत्पादन वाढीसाठी झाला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसोबतच त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी सर्वांगीण उपाय योजना करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यानी आपले योगदान द्यावे असे आव्हान त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. डॉ. यु. बी. होले म्हणाले, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम हा केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून त्यंच्या कलागुणांना विकसीत करण्यास वाव  मिळतो.
    कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत डॉ. पी. पी. गिरासे, उपाध्यक्ष विद्यार्थी परिषद यांनी महाविद्यालाच्या दहा वर्षातील प्रगतीचा आढावा मांडला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी वर्षभरात शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक, राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन
मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
  आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी चि. अशोक ठवळे- ५००० मीटर धावणे व कु. अर्चना कोळी- १०० मीटर धावणे यांचा गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्य हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यासाठी विद्यार्थ्यांना प्रा. शारिरीक शिक्षण निर्देशक डॉ. एम. एस. भारती यांचे मार्गदर्शन लाभले.
शैक्षणिक वर्ष प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील गुणवत्ता प्राप्तशैक्षणिक वर्ष प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना देखील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
  सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पारंपारिक नृत्य, संगीत, गायन, पोवाडा व नाटिका यांचे सादरीकरण केले. मंचावर महाविद्यालयाचे उपाध्यक्ष विद्यार्थी परिषद डॉ. पी.पी. गिरासे, सहाय्यक कुलसचिव  के. जे. पवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस. जी. राजपुत, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थी परीषद अध्यक्ष चि. तेजस परदेशी व उपाध्यक्ष चि. ऋतुराज कातोरे उपस्थित होते.
   महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. आर. ओ. ब्राम्हणे व प्रा. एस. डी. पाटोळे यांनी परीक्षकाचे काम पार पडले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालायचे सहाय्यक प्रा. डॉ. एम. एस. भारती, डॉ. एस. एस. वाघ व सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
 विद्यार्थीमंचावर महाविद्यालयाचे उपाध्यक्ष विद्यार्थी परिषद डॉ. पी. पी. गिरासे,सहाय्यक कुलसचिव  के. जे. पवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस. जी. राजपुत, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थी परीषद अध्यक्ष चि. तेजस परदेशी व उपाध्यक्ष चि. ऋतुराज कातोरे उपस्थित होते.
 कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. आर. ओ. ब्राम्हणे व प्रा. एस. डी. पाटोळे यांनी परीक्षकाचे काम पार पडले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालायचे सहाय्यक प्रा. डॉ. एम. एस. भारती, डॉ. एस. एस. वाघ व सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि. प्रतिक वसावे, कु. साक्षी जोपळे, चि. दिनेश सूर्यवंशी, कु. दिव्या पावरा, चि. पंकज पवार व कु. राजश्री साबळे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस. जी. राजपुत यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

जळखे आश्रमशाळेत प्रवेशोत्सव साजरा

Next Post

टेंभली येथील जि.प. मराठी शाळेत शाळारंभ दिवस साजरा

Next Post
टेंभली येथील जि.प. मराठी शाळेत शाळारंभ दिवस साजरा

टेंभली येथील जि.प. मराठी शाळेत शाळारंभ दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add