Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नामांकित शाळा व वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करण्याची मागणी

team by team
June 9, 2023
in राजकीय
0
नामांकित शाळा व वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करण्याची मागणी

तळोदा  l प्रतिनिधी
आदिवासी प्रकल्प अंतर्गत आदिवासी विदयार्थ्यांना नामांकित शाळेत इ.१ ली व इतर वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी यासाठी बिरसा फायटर्सने प्रकल्प अधिकारी तळोदा यांच्या मार्फत आयुक्त नाशिक व आदिवासी विकासमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,शैक्षणिक वर्ष २०२३-२४ हे १४ जून पासुन सुरु होत आहे.मात्र, एकात्मिक आदिवासी विकास विभागातंर्गत आदिवासी विदयार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत इ.१ ली व इतर वर्गाकरिता राबविण्यात येणारी अर्ज प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरु करण्यात आली नाही.शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास तीन -चार दिवस शिल्लक असतांना अर्ज भरून प्रवेश प्रक्रियाच सुरु न झाल्याने पालक संभ्रमअवस्थेत आहे.आदिवासी विकास विभागात एवढी उदासीनता का?
आदिवासी विभाग प्रवेश प्रकिया लवकर राबवत नसल्याने पालक -विदयार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो.तसेच,आता तीन-चार  दिवसात शाळा,महाविद्यालये सुरु होतील.त्यासाठी वसतिगृह नवीन प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरु करून, जुन्या विदयार्थ्यांना १४ जूनलाच प्रवेश देण्यात यावा.गेल्या वर्षीही वसतिगृह प्रवेश प्रक्रिया लवकर राबविण्यात आली नाही.शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपत येतं;तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही हे दुर्दैव आहे.आदिवासी विकास विभाग जाणूनबुजून उशिराने प्रवेश प्रक्रिया राबवते का?असा प्रश्न उपस्थित होतो.विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्वरित प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी केली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,जिल्हाध्यक्ष भरत पावरा, राणीपुर शाखाध्यक्ष सुरेश वसावे, राजू प्रधान,शिवदास पाडवी यांच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बिरसा मुंडा पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Next Post

फोटोसह मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर;जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी

फोटोसह मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर;जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add