नंदुरबार l प्रतिनिधी
कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषकतत्वे शरीराला मिळणे गरजेचे आहे . त्या संदर्भात जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी दिली आहे.
धडगाव येथील ठकार महाविद्यालयाच्या सभागृहात जागतिक पोषण दिवसानिमित्त प्लानइंडियाच्या “रिच इच चाईल्ड” प्रकल्पांतर्गत पोषण व त्याचे महत्व स्थानिक ठिकाणी सहज मिळणारेआहारातील पोषणयुक्त घटक व त्याचे फायदे या विषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती संगिता गावित , कृषी विज्ञान केंद्राच्या आरती देशमुख, सीडीपीओ किशोर पगारे , राजकुमार येवले,प्लान इंडिया चे राज्य व्यवस्थापक दत्तात्रय सोनगरे उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया गावित पुढे म्हणाल्या की, धडगाव तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण दिसून येते ते कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेसह विविध विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याचे डॉ सुप्रिया गावित यांनी सांगितले. संस्थेबाबत कुपोषण जनजागृती संदर्भात विविध उपक्रम घेण्यात येत असतात त्या संदर्भात त्यांनी कौतुक केले.
यावेळी महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांनी सांगितले की कमी वयात लग्न झाले की उपोषणाचे प्रमाण वाढू लागते ते कमी करण्यासाठी बालविवाह रोखणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
प्लान इंडिया चे राज्य व्यवस्थापक दत्तात्रय सोनगरे यांनी संस्थेचे विविध राज्यातील सुरु असलेल्या कार्यक्रमाची माहिती या ठिकाणी दिली.व रिच इच चाईल्ड मार्फत नंदुरबार व अमरावती जिल्हयात सॅम व मॅम तसेच गरोदर मातेला कश्या पद्धतीने मदत करण्यात येते हे सांगितले.
यावेळी डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते सॅम व मॅम बालकांना आरोग्यकीटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोषण आहारा संदर्भात प्रदर्शन मांडण्यात आले होते तसेच स्वच्छ हात धुवून याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.आशावर्कर , अंगणवाडी सेविका, कम्युनिटी न्यूट्रीशनवर्कर, व इतर सामाजिक संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.