नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती उप सभापती तसेच तालुका शेतकरी सह.संघाचे चेअरमन व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी यांची नव नियुक्त संपर्क प्रमुख माजी आ. प्रा. शरद पाटील यांच्या सोबत परिचय व पक्ष वाढीसाठी पक्षाची रणनीती ठरविणे तसेच पुढील वाटचाल याबाबत विचार विनिमय करण्यासाठी अक्कलकुवा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणुन नंदुरबार जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्क प्रमुख माजी आ. प्रा. शरद पाटील, विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभांगी पाटील, महिला आघाडीच्या नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख विद्या साळी, सह संपर्क प्रमुख अरुण चौधरी, जिल्हा समन्वयक दिपक गवते, धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती गणेश पराडके, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रिना पाडवी, युवती सेना जिल्हा प्रमुख मालती वळवी, धुळे पंचायत समितीचे माजी सभापती कैलास पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी पक्ष वाढीसाठी प्रा.शरद पाटील ,आ.आमश्या पाडवी, शुभांगी पाटील, विद्या साळी, गोटू पाटील, अरुण चौधरी, दिपक गवते आदींनी मार्गदर्शन केले.
बैठकीत अक्कलकुवा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती उप सभापती तसेच तालुका शेतकरी सह.संघाचे चेअरमन व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक युवा सेनेचे जिल्हा युवाधिकारी ललित जाट यांनी केले. बैठकीला नवापूर तालुका प्रमुख कल्पित नाईक, शहादा तालुका प्रमुख राजु लोहार, अक्कलकुवा तालुका प्रमुख मगन वसावे, धडगाव तालुका प्रमुख महेश पाडवी, नंदुरबार तालुका प्रमुख विजय ठाकरे, जिल्हा उप प्रमुख मधुकर मिस्त्री, के.टी.गावित, मंगलसिंग वळवी,कृषि उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती टेडग्या वसावे, शेतकरी सह.संघाचे व्हा चेअरमन अशोक पाडवी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक आदी उपस्थित होते.
बैठकीचे सुत्र संचालन जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले यांनी केले.तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाप्रमुख के.टी.गावित यांनी मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी युवा सेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी , नटवर पाडवी, शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, गोलू चंदेल,विनोद वळवी, कुवरसिंग पाडवी, जसराज पवार
आदींनी परिश्रम घेतले. बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या सह सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.