Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मेढपाळ ठेलारी समाजालाही मेढपाळ धनगर समाजाच्या सवलती लागू कराव्यात

युवा ठेलारी संघाचे आमदार किशोर दराडेंना निवेदन

team by team
May 20, 2023
in राज्य
0
मेढपाळ ठेलारी समाजालाही मेढपाळ धनगर समाजाच्या सवलती लागू कराव्यात

नंदुरबार  l

 

मेंढपाळ धनगर समाजात लागु असलेल्या योजना मेंढपाळ ठेलारी समाजालाही लागू कराव्यात, अशी मागणी युवा ठेलारी संघातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन युवा ठेलारी संघातर्फे विधान परिषदेचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांना देण्यात आले.

 

 

 

युवा ठेलारी संघाचे महाराष्ट्र प्रदेश सहउपाध्यक्ष सावळीराम करिया दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात मेंढपाळ धनगर समाजाबरोबरही मेंढपाळ ठेलारी समाज हा भटका समाज असून तो आपल्या उदरनिर्वाहासाठी तसेच मेंढी चराईसाठी दिवस-रात्र भटकंतीवर असतो. त्यामुळे मेंढपाळ ठेलारी समाजाला न्याय मिळत नाही. तसेच महाराष्ट्र शासनाने एन.टी. ‘क’ मध्ये येणार्‍या समाजांना ज्या सवलती महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या आहेत,

 

 

त्या सवलती एन.टी. ‘ब’  मधील फक्त मेंढपाळ ठेलारी समाजाला सुद्धा लागु करण्यात याव्यात. कारण धनगर आणि ठेलारी समाजात खुपच साम्य असून आज मेंढपाळ धनगर समाज शिकुन तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असून मेंढपाळ ठेलारी समाजाच्या लोकांची कायम भटकंती असते. त्यामुळे त्यांची मुलेही शिक्षणापासून वंचित राहत असतात. त्यांना राज्य शासनाच्या कुठल्याही सवलती मिळत नाहीत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देवून महाराष्ट्रातील मेंढपाळ ठेलारी समाजाला एन.टी. ‘क’ प्रमाणे सवलती द्याव्यात. जेणेकरुन मेंढपाळ ठेलारी समाजातील मुलांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाता येईल.

 

 

तसेच घरकुल, महामेष योजना व इतर आर्थिक लाभही मेंढपाळ ठेलारी समाजातील लोकांना मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या अशा दुजाभावामुळे मेंढपाळ ठेलारी समाजात अत्यंत नाराजगी असून आमची आपणांस विनंती आहे की, आपण ठेलारी समाजासाठी विशेष महामंडळाचे गठन करावे व ठेलारी समाजाचा उद्धार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी युवा ठेलारी संघाचे प्रदेश सहउपाध्यक्ष सावळीराम करिया, युवा मल्हार सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा धनश्री आजगे, देवा मानवर, मकडू टकले, बंडू गोयकर, सुका टकले, किशोर कोळेकर, मगन गोयकर, काशिराम श्रीराम, विठ्ठल टकले, कृष्णा करे, नथा गोयकर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा

Next Post

मोठ्ठी बातमी : रापापूर येथे वादळ व अवकाळी पावसामुळे २० च्या वर घरांचे नुकसान

Next Post
मोठ्ठी बातमी : रापापूर येथे वादळ  व अवकाळी पावसामुळे २० च्या वर घरांचे नुकसान

मोठ्ठी बातमी : रापापूर येथे वादळ व अवकाळी पावसामुळे २० च्या वर घरांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add