Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंग वळवी तर उपसभापतीपदी वर्षा पाटील बिनविरोध

team by team
May 18, 2023
in राजकीय
0
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंग वळवी तर उपसभापतीपदी वर्षा पाटील बिनविरोध

नंदुरबार l प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंग वळवी तर उपसभापतीपदी वर्षा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या असंख्य समर्थक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय संपादन करीत १८ पैकी १७  जागांवर उमेदवार निवडून आले होते तर हमाल मापाडी मतदारसंघातुन अपक्ष उमेदवार अशोक आरडे यांनी पाठिंबा दिल्याने सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया एकतर्फी झाली.

आज गुरुवार,१८ मे रोजी बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा सहाय्यक उपनिबंधक भारती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यांना सहाय्य सचिव योगेश अमृतकर यांनी केले.विहित मुदतीमध्ये सभापतीपदासाठी विक्रमसिंग वळवी तर उपसभापती पदासाठी वर्षा पाटील यांच्या एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले. निवड झाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सभापती, उपसभापतींच्या सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या.

प्रसंगी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, पालिकेचे माजी सभापती कैलास पाटील माजी नगरसेवक परवेज खान, रवींद्र पवार,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णदास पाटील,तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, विविध गावातील सरपंच, उपसरपंच व बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.

रघुवंशींची खेळी

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांच्या पराभव विक्रमसिंग वळवी यांनी केल्याने यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ घालून शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी खेळी केल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यातील सर्व रत्नांवर ‘दगडधोंडे’ भारी

जिल्ह्यात ५ कृषी उत्पन्न बाजार बाजार समित्यांमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे संचालक आहेत.नंदुरबार, नवापूर,धडगाव मध्ये सभापती, उपसभापतींचे निवड झाली. मतदारांनी बाजार समिती निवडणुकीत मोठा विश्वास दाखवलेला आहे. सर्व संचालक मंडळ शेतकरी, हमाल मापाडी व जनतेशी निगडित असलेली कामे प्रामाणिक करतील. एकीकडे विकासरत्न,संसदरत्न, जिल्हारत्न विरोधकांकडे असतांना आमचे ‘दगडधोंडे’ सर्वच रत्नांवर भारी पडल्याची प्रतिक्रिया माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी बी.के पाटील तर उपाध्यक्षपदी भारतसिंह राजपूत बिनविरोध

Next Post

भगवान शंकराच्या पिंडीला हिरवी चादर चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add