Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई, 46 लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
May 16, 2023
in क्राईम
0
अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई, 46 लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदूरबार l प्रतिनिधी

 

सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी हॉटेलजवळ अवैध दारूच्या वाहतूकीवर नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई, 46 लाख 05 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली आहे.

 

 

गुजरात राज्यात दारुबंदी असल्यामुळे महाराष्ट्रातून अवैध दारुची चोरटी वाहतूक होत असते. त्याविषयीच्या तक्रारी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने गुजरात राज्यात अवैधपणे दारुची वाहतूक होणार नाही तसेच अवैध दारुची तस्करी करणाऱ्यांची माहिती काढून त्यांचेवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते

 

 

.दि.15 मे रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धुळ्याकडून विसरवाडी, नवापूर मार्गे महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात अशोक लेलैंड कंपनीच्या कंटेनरमधून अवैध दारुची चोरटी वाहतूक होणार आहे, त्यावरून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना देवून नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे मिळून एक पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.

 

 

मिळालेल्या बातमीच्या आधारे नवापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी हॉटेलजवळ सापळा रचला. धुळे जिल्ह्याकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असतांना रात्री १० वा. सुमारास एक अशोक लेलैंड कंपनीचा तपकिरी रंगाचा कंटेनर भरधाव वेगाने येतांना दिसला, म्हणून पोलीस पथकातील अमंलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने त्यास उभे करण्याचा इशारा देवून वाहन थांबविले. वाहनातील प्रकाश नरसिंगराम देवासी रा. गंगाणी ता. बावडी जि. जोधपुर (राजस्थान) यास पथकांनी त्यास वाहनात काय भरले आहे ? याबाबत विचारपूस केली असता,

 

 

वाहनात मेडीको कंपनीचे औषधाचे खोके असून ते अहमदनगर येथून हिमा फार्मसीट्रीकल्स प्रा.लि. अंकलेश्वर, गुजरात येथे घेवून जात असल्याबाबत सांगून त्याबाबत बिलाची छायांकीत प्रत दाखविली. वाहन चालकास विचारपूस करीत असतांना तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे समजून आल्याने पथकांनी वाहन ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली असता त्यात खाकी रंगाचे बॉक्स व त्यामध्ये विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या. म्हणून सदरचे चारचाकी वाहन विसरवाडी पोलीस ठाणे येथे आणून वाहनाची तपासणी केली असता

 

 

23 लाख 32 हजार 800 रुपये किमतीचे इम्पेरियल ब्लु विस्कीचे 648 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम. एल. च्या एकुण 31,104 नग काचेच्या बाटल्या. 3 लाख 88 हजार 80/ रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज फिनेस्ट प्रीमियम विस्किचे
98 खाकी रंगाचे खोके, त्यात 750 एम. एल. च्या एकुण 1176 नग काचेच्या बाटल्या.

 

 

3 लाख 79 हजार 440 /- रुपये किमतीचे रॉयल चॅलेंज फिनेस्ट प्रीमियम विस्किचे93 खाकी रंगाचे खोके, त्यात 180 एम. एल. च्या एकुण 4464 नग काचेच्या बाटल्या. 5 हजार रुपये किमतीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, झालानी मेडीकोचे ई-वे बील, 15 लाख रुपये किमतीचा एक अशोक लेलैंड कंपनीचा कंटेनर ( क्र.के. ए. -51, बी -9974)
असा एकुण 46 लाख 05 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन सदरचा मुद्देमाल जप्त करुन प्रकाश नरसिंगराम देवासी, रा. गंगाणी ता. बावडी जि. जोधपुर राजस्थान खोटे बनावट ई वे.बिल, टॅक्स इन्कम बनवून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक

 

 

करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून गुजरात राज्यात अवैध विदेशी दारु विक्री करण्याचे उद्देशाने मिळून आला म्हणून त्याच्याविरुध्द् विसरवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 108, सह भा.द.वि. कलम 420, 468 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आलेला आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उप निरीक्षक भुषण बैसाणे, पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील, सहा. पोलीस उप निरीक्षक युवराज परदेशी, पोलीस हवालदार पंकज पाटील, दिनेश वसुले, राजेश येलवे. पोलीस नाईक किशोर वळवी, योगेश थोरात, अतुल पानपाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, जितेंद्र ठाकुर, विशाल नागरे, दादाभाई मासुळ, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र काटके, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

घरकुलाची रक्कम साडेतीन लाखापर्यंत वाढवून मिळावी: ट्रायबल फोरमचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

श्रॉफ हायस्कूल इमारतीला बेकायदेशीरपणे लावलेले सील त्वरित काढण्याचे उच्च न्यायालयाने दिले अंतरिम आदेश

Next Post
श्रॉफ हायस्कूल इमारतीला बेकायदेशीरपणे लावलेले सील त्वरित काढण्याचे उच्च न्यायालयाने दिले अंतरिम आदेश

श्रॉफ हायस्कूल इमारतीला बेकायदेशीरपणे लावलेले सील त्वरित काढण्याचे उच्च न्यायालयाने दिले अंतरिम आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add