म्हसावद l प्रतिनिधी
अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा जळखे (ता.नंदुरबार) येथील क्रीडा शिक्षक तथा खो.खो.चे प्रशिक्षक अनिल रौंदळ यांना निकम विभागीय आदर्श क्रिडा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
क्रीडा शिक्षक अनिल रौंदळ यांना महाराष्ट्र राज्य शारिरीक शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ व प्रा.रविंद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी गोंदूर रोड धुळे येथे आयोजित प्रथम विभागीय प्रा.रविंद्र निकम आदर्श प्रशिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांनी घडविलेल्या शालेय तसेच महाविद्यालयीन खेळाडूच्या राष्ट्रीय, राज्य,विभागीय, विद्यापीठ स्तरावर आपल्या दैदिप्यमान कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
त्यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष कृष्णदास पाटील,सचिव नितीन पंचभाई संचालक मंडळाने,माध्यमिक मुख्याध्यापक प्रविणकुमार सोनवणे, प्राथमिक मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी तसेच शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी यांनी केले आहे.त्यांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.








