नंदूरबार l प्रतिनिधी
जिजामाता महाविद्यालय व योजक यांच्या संयुक्त विद्यमाने जी 20 अंतर्गत पर्यावरण पूरक जीवनशैली या विषयावर राज्यस्तरीय एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख व्याख्याते म्हणून अध्यक्ष योजक डॉ. गजानन डांगे यांनी विद्यार्थ्यांना G20 व C20 याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक जीवनशैलीचे अवलंबन करणे अनिवार्य आहे हे पटवून दिले. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे जागतिक तापमान वाढत आहे प्रदूषण वाढत आहे या सर्व घटकांना मनुष्य जबाबदार आहे म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन याचा गांभीर्याने विचार करून आपली जीवनशैली ठरवावी व पुढील येणारे संकट कसे टाळता येतील याचा गांभीर्याने विचार करावा.नंदुरबार जिल्ह्यातील जंगलतोड जुन्या विहिरी पुनर्जीवीत करणे पारंपरिक जीवनशैलीचा वापर करणे ही काळाची गरज आहे. या दृष्टीने सगळ्या महाविद्यालयांनी व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांकडून जनजागृती करणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.डी. एस. पाटील.प्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी. प्राचार्य डाॅ. संजय शिंदे.श्री हसाने सर,शहरातील तीनही महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेच्या मार्गदर्शक संस्थेच्या अध्यक्षा. श्रीमती शोभाताई मोरे यांनी आयोजना संदर्भात मार्गदर्शन केले.प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश देवरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन डॉ.डी.व्ही. सोनवणे यांनी केले कार्यशाळेचे संयोजन भारत खैरनार, डॉ.ए.बी. देशमुख यांनी केले.प्रास्ताविक प्राध्यापक खंदारे यांनी केले.








