Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चार दिवसात नंदुरबार पोलीसांनी रोखले पाच बालविवाह

team by team
May 16, 2023
in क्राईम
0
ढंढाणे येथे पोलीसांनी रोखला बालविवाह
नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाणे हद्दीत सरी केलीपाडा येथे होणारा बालविवाह पथकाने रोखला आहे.ग़ेल्या चार दिवसात नंदुरबार पोलीसांनी पाच बालविवाह रोखले आहेत.
दि.१३ मे रोजी मोलगी व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा गावात एका अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबीय नियोजन करीत आहे व अक्कलकुवा तालुक्यातील निंबापाटी गावाचा राऊतपाडा येथील अल्पवयीन मुलींचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार मोलगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ माहिती काढली असता,
मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील सरी केलीपाडा गावात एका अल्पवयीन मुलीचा विवाह भगदरी ता.अक्कलकुवा येथील तरुणासोबत निश्चित करण्यात आला होता. परंतु मोलगी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांनी अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांचे व गावातील नागरिक यांना कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीतील निंबापाटी राऊतपाडा या गावात जावून अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी माहिती घेतली असता तेथे अल्पवयीन मुलीचा वालंबा गावातील तरुणासोबत विवाह निश्चित करुन दि. 13 मे 2023 रोजीच विवाह होणार होता,
परंतु अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश गावीत यांनी अल्पवयीन मुलीचे आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाईकांना तसेच गावकरी यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. ऑपरेशन अक्षता अंतर्गत नंदुरबार पोलीसांनी चार दिवसात पाच बालविवाह रोखल्याने पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

सोमावल गावाजवळ दुचाकींच्या धडकेत तिघांचा मृत्यू ; एक जखमी

Next Post

भिरता पावरा यांच्या निलंबना निषेधार्थ धडगाव तहसील कचेरीवर भव्य मोर्चा

Next Post
भिरता पावरा यांच्या निलंबना निषेधार्थ धडगाव तहसील कचेरीवर भव्य मोर्चा

भिरता पावरा यांच्या निलंबना निषेधार्थ धडगाव तहसील कचेरीवर भव्य मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add