नंदूरबार l प्रतिनिधी
कर्नाटक येथे आज लागलेल्या विधानसभेचा निकाल लागला असून यात काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून विजय संपादन केल्याबद्दल नंदूरबार येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्यालय जवळ असलेल्या भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या पुतळ्यासमोर कर्नाटकातील काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून विजय संपादन केल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष साजरा केला. याप्रसंगी माजी नगरसेवक तथा प्रदेश किसान काँग्रेस सचिव देवाजी चौधरी, समवेत राजेंद्र पाटील,इजाज बागवान,पंडित तडवी, आप्पा वाघ, फारुक शहा, दत्तू पवार, दीपक भालेराव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.








