नंदुरबार l प्रतिनिधी
वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली असून आज उन्हाळी हंगामातील सर्वोच्च 44.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आजचे कमाल तापमान या उन्हाळी हंगामातील सर्वोच्च होते.आज कृषि विज्ञान केंद्र, कोळदा येथे भारतीय हवामान विभागाकडून जिल्हा कृषि हवामान केंद्र अंतर्गत बसवलेल्या स्वयंचलित कृषिहवामान यंञात ४४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.