नंदुरबार l प्रतिनिधी
एक मे महाराष्ट्र दिनीकामगार दिनाच्या औचित्य साधून येथील मंगळ बाजार व्यापारी असोशियन तर्फे कष्टकरी कामगारमहिला पुरुषांचा सन्मानान करण्यात आला.
याप्रसंगी सर्वप्रथम मंगळ बाजार व्यापारी असोसिएशनचे दिवंगत मंगा सजन चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे,महिला सक्षमीकरण समितीच्या कार्यकर्त्या सुलभा महिरे,ऍड शुभांगी चौधरी,माजी नगरसेवक संजय मक्कन चौधरी,डॉ चेतन चौधरी,रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन,राष्ट्रवादी सेवादलचे एजाज बागवान,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र चौधरी यांनी केले. कामगारांच्या सन्मानाचे कौतुक करीत अभिजीत मोरे, सुलभा महिरे,शुभांगी चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगीमंगळ बाजारातील भाजीपाला विक्रेत्या महिला व कष्टकरी हमालांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी स्व. ज्ञानदेव राजपूत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रेमचंद राजपूत,सलीम खाटीक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.