Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
April 28, 2023
in शैक्षणिक
0
पीएमश्री योजेने अंतर्गत विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील ८ शाळांचा आदर्श शाळा म्हणून विकास होणार

नंदुरबार  l  प्रतिनिधी

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2023- 2024 या शैक्षणिक वर्षांत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नवापुर (सध्या बंधारे ) या निवासी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहे.

 

 

 

प्रवेश अर्ज 29 एप्रिल, 2023 ते 6 मे, 2023 या कालावधीत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नवापुर (सध्या बंधारे ) ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत मिळतील. परीपुर्ण भरलेले प्रवेश अर्ज शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, ता.नवापुर जि. नंदुरबार येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत, दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्य प्रमाणपत्राची प्रत जोडावी. विद्यार्थ्याचे पालक शासकीय, निमशासकीय सेवेत नसल्याबाबत हमीपत्र जोडावे.

 

 

 

 

महिला पालक विधवा, घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 1 जुलै, 2016 ते 31 डिसेंबर, 2017 या दरम्यान झालेला असावा. अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा  दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नवापूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल

Next Post

वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू वा जाळू नका महावितरणचे नागरिकांना आवाहन

Next Post
वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू वा जाळू नका  महावितरणचे नागरिकांना आवाहन

वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू वा जाळू नका महावितरणचे नागरिकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add