Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड, दोन लाखांचा मुद्देमालासह एकास अटक

team by team
April 27, 2023
in क्राईम
0
नंदुरबार : घरफोडीचा गुन्हा अवघ्या 8 तासात उघड, दोन लाखांचा मुद्देमालासह एकास अटक
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जुनी सिंधी कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या 8 तासात उघड करीत दोन लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करीत एकास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 25 एप्रिल  रोजी रात्री 3.45 वा. सुमारास गीता सचानंद गंगवाणी  रा. जुनी सिंधी कॉलनी, प्लॉट नंबर- ई-4 यांचे राहते घराचे स्वयंपाक खोलीच्या बंद दरवाजा अज्ञात आरोपीताने उघडून घरातील कपाटामधून 2 लक्ष 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक मोबाईल चोरुन नेला म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीताविरुध्द् गुन्हा नोंदविण्यात आला होता.
25 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुनी सिंधी कॉलनी येथे सकाळी झालेली घरफोडी नंदुरबार शहरातील सराईत आरोपी बुट्टा याने केलेली असून तो गिरीविहार गेट परिसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना सांगितली. उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीमधील संशयीतास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.
उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयीत आरोपी बुट्टा याचा गिरीविहार गेट परिसरात जावून शोध घेतला असता काका का ढाबा येथे तो दिसला. उपनगर पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या दिशने येत असल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढला, परंतु पथकाने त्यास पाठलाग करुन विशाल ऊर्फ बुट्टा विजयकुमार तलरेजा  रा. बाबा गरीबदास मंदिराच्या मागे, सिंधी कॉलनी, नंदुरबार यास अटक केली. त्याची कायदेशीर प्रक्रिया करुन झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 60 हजार 800 रुपये रोख, 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकुण 2 लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीतास वरनमुद सोन्याचे दागिने, रोख रुपये व मोबाईल बाबत विचारपूस केली असता त्याने जुनि सिंधी कॉलनी येथे एका घराचा स्वयंपाक खोलीच्या बंद दरवाजा उघडून घरातील कपाटातून चोरी केलेबाबत सविस्तर माहिती दिली.
त्याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीतावर यापूर्वी देखील नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुध्द्चे 5 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समजून आल्याने त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे  पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी यावेळी सांगितले.
घरफोडी सारखा मालमत्तेविरुध्द्चा गंभीर गुन्हा अवघ्या 8 तासात उघड करुन मुद्देमाल हस्तगत करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकास पेालीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी रोख बक्षिस जाहीर केले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उप निरीक्षक प्रविण कोळी, सहा. पोलीस उप निरीक्षक पानाजी वसावे, पोलीस अंमलदार विलास वसावे, विपुल पाटील, बाबुराव बागुल यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला

Next Post

विधान परिषदेच्या नवीन सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणात आ. आमश्या पाडवी यांचा सहभाग

Next Post
विधान परिषदेच्या नवीन सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणात आ. आमश्या पाडवी यांचा सहभाग

विधान परिषदेच्या नवीन सदस्यांचे एक दिवसीय प्रशिक्षणात आ. आमश्या पाडवी यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add