नंदुरबार l प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रीमोट पद्धतीने शुक्रवार 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण देशात 91 व 100 डब्ल्यू ट्रान्समीटरचे उद्धटन होणार असल्याची माहिती जळगाव आकाशवाणीचे केंद्रप्रमुख दिलीप म्हसाने यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नंदुरबार येथील पूर्वीच्या दूरदर्शन केंद्रात 100 डब्ल्यू एफएम ट्रान्समिटर सुरु होणार आहे. या ट्रान्समीटर मुळे नंदुरबार परिसरातील आदिवासी वाडी,वस्तींपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण ऐकू येईल. तरी या उद्घाटन सभारंभास वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडीया प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव आकाशवाणीचे केंद्रप्रमुख श्री. म्हसाने यांनी केले आहे.