नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आष्टे-खोलविहीर-मालवण- खांडबारा रस्तावरील सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आष्टे येथे शिवण नदीवर नवीन बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमीपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खा. डॉ.हिना गावित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जे.बी.वळवी, सरपंच किसन सोनवणे (आष्टे), बकाराम बागुल (गंगापूर ), वासुदेव गायकवाड (आंबापूर ), यशवंत गांगुर्डे (श्रीरारमपूर ), अशोग गावित (नागसर ), रोहीदास बागुल (नवागांव ), शांतु चौरे (आंबापूर ), देविदास गांगुर्डे (अजेपूर ), उपसरपंच पुष्पाबाई शेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य बटन गायकवाड, विजय शेवाळे, वसंत पाटील, बालू पावरा, सुरेश गांगुर्डे, राजाराम पवार, दशरथ ठाकरे, शंकराराव खंदारे, गणेश खाडे,गजमल तात्या,पुंजूभाऊ, सुनिल चौरे, कांतिलाल पाडवी, दिलीप पाडवी, पंडीत पवार, शाहीराम कोकणी यांच्यास ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रमुख राज्यमार्ग क्रमांक 8 पासून आष्टे-खोलविहीर-मालवण- खांडबारा नदीवरील रस्यावीवर 10 मीटर लांबीच्या 7 गाळे असलेला या नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. हा पुल बांधण्यासाठी 3 कोटी 61 लक्ष इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या नविन पुलामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.








