नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात अक्षय तृतीया निमित्त दगड उचलून सालदार ठरविण्याची परंपरा होती.मात्र ती परंपरा खंडित झाली आहे. परिसरातील युवक दगडाची पूजा करतात त्यानंतर युवक मनोरंजन म्हणून दगड उचलत असतात यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी युवकांचे कौतुक केले यावेळी माणिक माळी ,प्रकाश पाटील, मनोज गायकवाड, निंबा माळी, भास्कर माळी यांच्यासह परिसरातील युवक व नागरिक उपस्थित होते.








