नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारो नागरिकांच्या साक्षीने लांगड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यंदा यात्रा भरण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला होता. २२ एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त खंडेराव महाराजांची यात्रा भरली.पाचवी पिढीतील श्रीखंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र मराठे बारा गाडी ओढणार होते. पाच वर्षापासून जितेंद्र मराठे हेच यात्रेत बारा गाड्या ओढत आहेत. मात्र यंदा त्यांचे लहान बंधू महेंद्र मराठे यांनी बारा गाड्या ओढल्या.
महेंद्र मराठे यांचे खापर पंजोबा श्री खंडेरावाचे सेवकरी लकडू मराठे हे आईचा आहे आईचाळे ता. साक्री इथून उमर्दे खुर्द येथे वास्तव्यास आले त्यांनी बारा गाडी ओढण्याच्या कार्यक्रमास सुरुवात केली. उमर्दे येथे खंडेरावाची स्थापना केली तेव्हापासून अखंडपणे अक्षय तृतीया खंडेरावाची यात्रा भरते.१९९५ श्री. खंडेराव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.श्री.खंडेराव महाराज माळसाबाई व बानुबाई यांची मूर्ती स्थापना करण्यात आली.
बारा गाड्या ओढण्याचा जातात.लकडू मराठे नंतर त्यांचा मुलगा दगा लकडू मराठे , गोकुळ दगा मराठे, सुदाम गोकुळ मराठे आता पाचव्या पिढीतील श्री. खंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र सुदाम मराठे यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करतात मात्र यंदा त्यांचे लहान बंधू महेंद्र मराठे यांनी बारा गाड्या ओढल्या.
सुरुवातीला तगतराव नंतर बारागाड्या ची रचना केली जाते.हा कार्यक्रम पाहण्यासाठी नंदुरबार सह परिसरातील धामडोद, दहिंदुले भालेर, नगाव, तिशी ,अक्राळे, वावद ,खोंडामळी विखरण शिंदगव्हान, काकर्दे आधी गावातील भाविक खंडेरावाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली होती. दोन वर्षानंतर यावर्षी श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरल्याने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.








