धडगांव | प्रतिनिधी-
रोहित पावरा यांची बिरसा फायटरच्या प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पदी निवड करण्यात आली आहे.
बिरसा फायटर्स संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा फायटर्स पदग्रहण ऑनलाईन सोहळासाठी झूम सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत रोहितपावरा यांना प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पदाची घोषणा करण्यात आली. सभेत महाराष्ट्र राज्यकार्यकारणी सोबतच विभागीय कार्यकारणी पदे,जिल्हा कार्यकारणी पदे,तालुका कार्यकारणी पदे निवड करून जाहीर करण्यात आली. या सभेला केशव पवार महानिरीक्षक,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी ,कोषाध्यक्ष दादाजी बागूल, सल्लागार ऍड. जगदीश पावरा,ऍड.रमेश पावरा,महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार,राज्यसदस्य मनोहर पाडवी,देवीदास वसावे,अशोक वळवी,अर्जून जाधव ,सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी,ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव,नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड,महासचिव उमाकांत कापडनीस , महेश्वरी कापडणीस नाशिक महिला प्रतिनिधी, बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार,विभाग प्रसिद्धीप्रमुख प्रितेश पावरा,नंदुरबार प्रसिद्धी प्रमुख गणेश खर्डे, शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी,तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,मुंबई जिल्हाध्यक्ष संदिप रघतवान,विपूल वळवी ,विजय सहारे इत्यादी बिरसा फायटर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
रोहितदादा पावरा यांची बिरसा फायटर्सच्या प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.