Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आशा माळी व कांताबेन पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण

team by team
April 1, 2023
in राज्य
0
आशा माळी व कांताबेन पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार  येथील महिला व बाल विकास विभागांतर्गत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेवून, त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून  नंदुरबार  तालुक्यातील भोणे येथील आशा माळी व शहादा शहरातील गुजर गल्लीतील कांताबेन काशिनाथ पाटील यांना  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हाधिकारी मनिषा खत्री  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महिला व बाल विकास कार्यालयातर्फे मार्फत  सन २०१४-१५ व २०१७-१८ या वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण रंगावली सभागृहात करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते निवड  झालेल्या समाज सेविकांना १० हजार रोख, स्मृती चिन्ह, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नेटवर्क ऑफ बाय पिपल, लिव्हींग विथ एचआयव्ही या संस्थेच्या अध्यक्षा भोणे येथील आशा माळी  यांनी  एचआयव्ही झालेल्या महिला, पुरुष व मुलांना, ज्यांना समाजाने नाकारले आहे. अशा दुर्लक्षीत घटकासोबत भरीव कामगिरी केल्याने त्या कामाची दखल घेवून शासनाने, त्यांना सन २०१४-१५ या वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.
शहादा शहरातील गुजर गल्लीतील कांताबेन काशिनाथ पाटील यांची निवड शासनाकडुन करण्यात आलेली आहे. त्या शहादा नगरपालिकेच्या  माजी नगराध्यक्षा आहेत. गरजू, पिडीत महिलांसाठी चांगले काम केलेले असल्याने त्या कामाची दखल
घेवून शासनाने सन २०१७-१८ या वर्षाकरिता त्यांचीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.कार्यक्रमास महिला व बाल विकास अधिकारी  राजेंद्र बिरारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी  गिरीष जाधव, संरक्षण अधिकारी . रविंद्र काकळीज, लेखा अधिकारी  अशोक जगताप, पर्यवेक्षक अधिकारी  विजय लोखंडे, सुरेखा पवार, सुनिल पवार, व बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा प.स.च्या सभेत घरकुलासाठी १०० रु. स्टॅम्प न देता स्वयं घोषणपत्रच देण्याचा ठराव

Next Post

काकर्दे ग्रामपंचायतीतर्फे पत्रकार स्व.रवींद्र चव्हाण यांना अनोखी श्रद्धांजली; पाणी वितरणाच्या कालावधीचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add