Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा प.स.च्या सभेत घरकुलासाठी १०० रु. स्टॅम्प न देता स्वयं घोषणपत्रच देण्याचा ठराव

team by team
April 1, 2023
in राज्य
0
तळोदा प.स.च्या सभेत घरकुलासाठी १०० रु. स्टॅम्प न देता स्वयं घोषणपत्रच देण्याचा ठराव
तळोदा l प्रतिनिधी
     तळोदा येथे पंचायत समितीच्या सभापती तसेच उपसभापतीच्या दालनात मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .त्यात प्रामुख्याने शबरी घरकुल प्रस्तावाच्या फाईलला त्रूटी म्हणून १०० रु. स्टॅम्प पेपरमध्ये माहिती मागितली आहे ती १०० रु स्टॅम्प न वापरता स्वयं घोषणपत्रच द्यावे असे आदिवासी विकास विभागच्या कर्मचारी यांनी स्पष्ट केले आहे.
        मागील काही दिवसापासून ग्रामीण भागातील शबरी घरकुल लाभार्थी हे स्टॅम्प बाकी म्हणून पंचायत समितीमध्ये यासंदर्भात विचारपूस करत होते. त्या सर्वांची प्रत्यक्षात माहिती पंचायत समितीच्या बैठकीत मागविण्यात आली असता स्टॅम्पच घ्यावा असे कोणतेही वरीष्ठ कार्यालयाचे पत्र नसल्याचे संबंधित अधिकारी यांनी म्हटले.
या स्टॅम्प मुळे सामान्य लाभार्थी यांची आर्थिक  बाजू लक्ष्यात घेता खूप मोठा फटका बसत होता.कारण लाभार्थी हे दिवसाची मोलमजुरी बुडवून, तसेच तसेच तालुक्याच्या ठिकाणी येण्याचा प्रवास खर्च व इतर खर्च असा बराच आर्थिक भुर्दंड सामान्य लाभार्थी यांना बसत असल्याची कैफियत सर्व सदस्य यांनी या ठिकाणी मांडली तसेच त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाचे पत्र किंवा टिप्पणी विचारल्यावर ते तोंडी स्वरूपात असल्याचे जाणवले.
   त्यानंतर स्वयं घोषणा पत्र कायदा रद्द झाला का? त्या अंतर्गत काय सुविधा आहेत असा प्रश्न सदस्य दाज्या पावरा यांनी उपस्थित केल्यावर आम्ही १०० रु स्टॅम्प मागीतले नसल्याचे स्पष्ट केले.
     त्यामुळे यापुढे स्टँप न देण्याचे सर्वानुमते ठरले.
यावेळी या सभेला सभापती लताबाई वळवी,उपसभापती विजय राणा,सदस्य दाज्या पावरा,सुमनताई प्रधान,यशवंत ठाकरे,विक्रम पाडवी,चंदन पवार,लिलाबाई पवार,सुपिबाई ठाकरे तसेच,गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, विस्तार अधिकारी बी.के.पाडवी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतीसह नर्सरी विकसित करून साधली आर्थिक उन्नती

Next Post

आशा माळी व कांताबेन पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण

Next Post
आशा माळी व कांताबेन पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण

आशा माळी व कांताबेन पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add