शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विभागातील भूगोल मंडळाद्वारे जागतिक हवामान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ.प्रशांत आर.तोरवणे यांनी भूगोलातील विविध दिन साजरा करण्यामागचा उद्देश सांगितला. तसेच जागतिक हवामान बदलामागे मानवाच्या विविध क्रिया-प्रक्रिया कशा कारणीभूत आहेत,त्याचे पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रावरील होणाऱ्या परिणामाची कारणमीमांसा स्पष्ट केली.
हवामान बदलावर आपण काय करू शकतो यावर सविस्तर चर्चा घडवून आणली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भूगोल विभाग प्रमुख डॉ.यु.व्ही.निळे हे होते. यावेळी भूगोल विभागातील पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रा.राहुल व्ही. पाटील, प्रा.विकेश पावरा, प्रा.भूषण पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेंद्र वळवी व संजय विसावे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रकटन प्रा.मीना एन.पटेल यांनी केले.








