म्हसावद l प्रतिनिधी
आज शहादा सिनियर सायन्स महाविद्यालय येथे पिरामल फाऊंडेशन मार्फत करीयर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात महविद्यालयाचे प्राचार्य संदीप मराठे ,शिक्षक सोनाली पाटील,दीपक वळवी उपस्थित होते. पिरामल फाऊंडेशन चे गांधी फेलो रघुवीर जाटव ,प्रोग्राम लीडर साईनाथ अरगडे यांनी गांधी फेलोशिप संदर्भात विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. आयुष्याच्या वळणावर करीयर च्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते.करीयर निवड कशी करावी?परीक्षेची तयारी,शिक्षणाचे महत्त्व,उच्च शिक्षणाची संधी यावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी करीयर संदर्भात विविध प्रश्न विचारले असता त्यांना मार्गदर्शक यांचे कडून प्रश्नांचे योग्य निरसन करण्यात आले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक वळवी यांनी केले.या कार्यक्रमाला कॉलेज चे प्राचार्य, पिरामल फाऊंडेशन चे डिस्ट्रिक्ट लीड नीलचंद्र शेंडे,प्रोग्राम लीडर रमेश जायनाकर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे.








