नंदूरबार l प्रतिनिधी
गुरुवारी हुतात्मा स्मारक येथे शहीद भगतसिंग, राजगुरू, सुकदेव आणि शिरीषकुमार मेहता व बाल शहीदांना अभिवादन करून अंनिस कार्यकर्त्यांनी देहदानाचा संकल्प केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
समाजात आजही देहदान नेत्रदान यांबाबत मोठ्या प्रमाणात अनभिज्ञता व उदासीनता दिसून येते याबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जातात याच्यात एक भाग म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शहीद दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नंदुरबारच्या वतीने शिरीषकुमार यांच्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून सामूहिक देहदानाची संकल्प पत्रके अनिस कार्यकर्त्यांनी भरून दिली.याप्रसंगी डॉक्टर अर्जुन लालचंदाणी माजी जिल्हा अध्यक्ष महा.अंनिस यांनी देहदान व अवयव दान याबद्दल अधिक माहिती कार्यकर्त्यांना दिली.देहदान बद्दल समज,गैरसमज व देहदान बद्दलच्या अंधश्रद्धा याबद्दल अधिक माहिती देण्यात आली. कार्यकर्त्यांनी देहदान बद्दलचे स्वतःचे फॉर्म भरून घेतले.
यावेळी शाखेचे कार्याध्यक्ष सूर्यकांत आगळे, राज्य सोशल मीडिया विभागाचे कार्यवाह कीर्तीवर्धन तायडे, चंद्रमणी बरडे, फिरोज खान,सुबोध अहिरे,प्रविण धांद्रे, अनंत सुर्यवंशी, पराग जगदेव,सीमा पाटील,जितेंद्र खवळे,जितेंद्र मराठे,भाऊसाहेब कुवर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रास्ताविक वसंत वळवी यांनी मांडली व कार्यक्रमाचे संयोजन दीपक चौधरी यांनी केले होते.
दरम्यान,23 मार्च 30 मार्च या कालावधीत शहरातील नागरिकांना देहदान व अवयवदान संकल्पना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा नंदुरबारला संपर्क करावा व अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शहिदाना कृतिशील अभिवादन करावे,असे आवाहन करण्यात आले.