Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे धारधार शस्त्राने तरुणाचा झाला खून, तणावाचे वातावरण

team by team
February 4, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथे धारधार शस्त्राने तरुणाचा झाला खून, तणावाचे वातावरण
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात काल सायंकाळच्या सुमारास धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद होण्याचे काम सुरु होते.
सुत्रांच्या माहितीनूसार, काल दि.3 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात अरबाज खाटीक याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत संशयित जयेश गंगावने जीवेठार केले. बहिणीचा चार वर्षापूर्वी प्रेमविवाह केल्याची खदखद मनात ठेवून चाकू खुपसून खून केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटना घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी संतप्त जमाव जमला होता. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांततेचे आवाहन केले.
संशयित जयेश गंगावने यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कायदा आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्याची हयगय केली जाणार नाही, कोणीही अफवा पसरवू नयेत, शांतता राखावी, असे आवाहन पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी केले. दरम्यान, घटनास्थळासह परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण शांतता होती. कोणीही घटनेबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
बातमी शेअर करा
Previous Post

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तळमळीतूनच होते साहित्य व राजकीय नेतृत्वाची निर्मिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add