Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव पोलिसांनी 9 लाखाची अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल केला जप्त, एकास अटक

Mahesh Patil by Mahesh Patil
September 13, 2021
in क्राईम
0
धडगाव पोलिसांनी 9 लाखाची अवैध दारूसह  22 लाखाचा मुद्देमाल केला जप्त, एकास अटक
धडगाव l  प्रतिनिधी
 धडगाव- शहादा दरम्यान अवैध दारु वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धडगाव पोलिसांनी सापळा रचून 9 लाखाच्या अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघां विरूद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे.एकास अटक केली असून एक जण फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,  धडगावचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना गुप्त माहिती मिळाली की, मध्यरात्री शहादाकडून धडगावकडे अवैध दारुने भरलेला ट्रक येत आहे  श्री. औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव पोलिसांनी चोंदवाडे ता. धडगाव फाट्यावर रात्री 3.45 वाजता सापळा रचून ट्रक ( क्र.जी.जे. 16,डब्ल्यू , 8554 )हे वाहन अडवले. दरम्यान ट्रक चालकाला विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यात विना परवाना वाहतूक होणारी सुपर व्हिस्की या दारूचे तब्बल 100 बॉक्स आढळून आले. या बॉक्समध्ये प्रत्येकी 12 बाटल्या अशा एकूण 120 बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या असून त्याची 9 लाख एवढी किंमत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या 9 लाखाच्या दारुसह 13 लाखाचा ट्रक असा एकूण 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र चोरले यांच्या  फिर्यादीवरुन ट्रक चालक मालसिंग उतऱ्या पाडवी रा. जुनीकरी पाडा (काकडदा) ता. धडगाव व मंगल हिम्मतसिंग पावरा रा.उमराणी बी. या दोन जणांविरुद्ध धडगाव पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (ई), 108 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालसिंग उतऱ्या पाडवी यास  पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनानुसार संजय मनोरे,  राजेंद्र जाधव, विनोद पाटील, महेश कोळी, गणेश मराठे, हिरालाल सोनवणे व अभिमन्यू गावीत यांच्या पथकाने केली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाणे हे करत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत शेळी पालन प्रशिक्षण

Next Post

प्रकाशा येथील घाटावर गणपती विसर्जनासाठी जाण्यास प्रतिबंध

Next Post

प्रकाशा येथील घाटावर गणपती विसर्जनासाठी जाण्यास प्रतिबंध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group