Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जपानमधील वाकायामा राज्याबरोबरील सामंजस्य करारामुळे कुस्तीपटूंच्या तांत्रिक कौशल्यात भर – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

team by team
February 3, 2023
in राजकीय
0
जपानमधील वाकायामा राज्याबरोबरील सामंजस्य करारामुळे कुस्तीपटूंच्या तांत्रिक कौशल्यात भर – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

मुंबई  l

जपानमधील वाकायामा राज्याच्या कुस्तीगीर संघटनेबरोबर झालेल्या सामंजस्य करारातून राज्यातील कुस्तीपटूंना तांत्रिक मदत होवून त्यांचे कौशल्य वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विविध स्पर्धांमधील पदकांची संख्याही वाढेल, असे प्रतिपादन  क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

येथील सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य कराराप्रसंगी वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, आमदार मेघना बोर्डिकर- साकोरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त डॉ. सुहास दिवसे, वाकायामा राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष वातारू किमुरा, वाकायामाचे आमदार श्री. तानेगुची आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, या करारामुळे महाराष्ट्र व वाकायामा या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना परस्परांच्या देशात जाऊन एकत्र सराव, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे सुलभ होणार असून प्रशिक्षकांनाही सहकार्य करून खेळाडूंना नवनवीन तंत्रे शिकवणे शक्य होणार आहे. खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग  होणार असून खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे. पुणेस्थित असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपान (AFJ) या संस्थेच्या समन्वयाने हा करार साध्य झाला आहे. ही संस्था गेली ३२ वर्ष भारत व जपान या दोन देशांचे विविध क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी झटत आहे

कुस्ती तथा मल्ल विद्येला मोठा इतिहास आहे. वैदीक काळापासून हा खेळ खेळला जातो. महाभारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगांमध्ये  आढळतो. भारताला जी 20 गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व जपान या दोन जी २० समूहातील देशातील दोन राज्यांमध्ये होणारा करार हा सहकार्य वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, बदलत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीविषयक आयाम बरेच बदलले असून त्याअनुषंगाने राज्यातील कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदके मिळविता यावीत यासाठी राज्य शासन आणि वाकायामा स्टेट, जपान येथील वाकायामा प्रीफेक्चर कुस्ती महासंघ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, या कराराच्या निमित्ताने राज्यात जास्तीत जास्त पदक विजेते कुस्तीपटू घडावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आणि जपान बरोबर इतरही क्षेत्रात मैत्रीचे संबंध यामुळे दृढ होतील, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती भागवत यांनी केले, तर आभार आमदार मेघना बोर्डीकर यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

Next Post

मयत भिमसिंग तडवीचा अपघात नसून घातपात ? चौकशीची मागणी, पोलीस स्टेशन समोर उपोषण करण्याचा नातेवाईकांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add