Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना/सूचना

team by team
February 3, 2023
in राजकीय
0
वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प; थेट जनतेतून मागितल्या संकल्पना/सूचना

मुंबई  l 

 केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी सादर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावा, यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून सूचना आणि संकल्पना मागविल्या आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष आहे. 27 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असून, लवकरच कामकाज सल्लागार समितीत अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक ठरेल. महाराष्ट्रात आता अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाश: डीपीसी आणि विभागश: वार्षिक आराखड्यासाठी बैठकी पूर्ण झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली. पण, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

 ‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ हे पुस्तक त्यांनी आमदार असतानाच लिहिले आहे. अर्थसंकल्पावर अनेक व्याख्याने सुद्धा त्यांनी दिली आहेत. कालही केंद्रीय अर्थसंकल्पावर त्यांचे मुंबईत व्याख्यान झाले. यंदाच्या आणि आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात जनतेच्या सूचनांचे, संकल्पनांचे प्रतिबिंब असावे, म्हणून त्यांनी थेट जनतेतून सूचना, संकल्पना मागविल्या आहेत. http://bit.ly/MahaBudget23 या संकेतस्थळावर जाऊन लोकांना आपल्या संकल्पना मांडता येणार आहेत. त्यामुळेच निश्चित जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात असणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

Next Post

50 ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी 5 व्यक्तींना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण

Next Post
50 ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी 5 व्यक्तींना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण

50 ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी 5 व्यक्तींना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

October 4, 2026
गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

October 4, 2026
पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

October 4, 2026
नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

October 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add