नाशिक | प्रतिनिधी
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. मतपत्रिकांची छाननी करून वेगवेगळे गठ्ठे करत २८ टेबलांवर मतमोजणी सुरु आहे.दुसऱ्या फेरी अंती सत्यजित तांबे तब्बल साडे चौदा हजार मतांनी आघाडीवर आहेत.
नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्याउमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत
असून दुसऱ्या फेरी अंती सत्यजित तांबे तब्बल साडे चौदा हजार मतांनी आघाडीवर आहेत.
मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे.पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना 15 हजार 774 मते मिळाली होती त्यांनी पहिल्याच फेरीत 8 हजार 266 मतांची आघाडी घेतली होती.








