Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज मतमोजणी, 28 टेबलवर होणार मतमोजणी

team by team
February 2, 2023
in राजकीय
0
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज मतमोजणी, 28 टेबलवर होणार मतमोजणी
नंदूरबार l प्रतिनिधी
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी रोजी सय्यद पिंप्री येथील गोदामात  होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मत मोजणी प्रशिक्षणपूर्ण झाले आहे.
मतमोजणी प्रकिया
नाशिक पदवीधर  मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण  1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर होणार आहे. एका टेबलावर एक तहसीलदार आणि दोन नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व मतपेट्यामधील मतपत्रिका एकत्रित करून त्यांचे एक हजाराचे गठ्ठे करण्यात येतील.यानंतर बाद मतपत्रिका बाजूला काढून वैध मतपत्रिकेवरून कोटा ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
अशी करण्यात आली आहे तयारी
मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष,  केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनी देखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थाबावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

…..आणि चंदनचोर पुष्पाराज मुद्देमाल सोडून झाला फरार

Next Post

१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या

Next Post
१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या

१० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दोन ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add