नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील वडझाकण गावामध्ये दारूच्या व्यसनामुळे गावातील सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब होत असल्यामुळे. गावातील महिला बचत गट सदस्यांनी गावात असलेले अवैध दारूचे दुकाने तसेच हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर साहित्य जाळून होळी केली.

महिला बचत गट तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून गावामध्ये दारूबंदीसाठी वारंवार पोलीस विभाग तसेच प्रशासनाला विनंती करून देखील. अवैध दारूचे धंदे बंद होत नसल्यामुळे. अखेर महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन गावात सामाजिक कौटुंबिक शांतता टिकून राहावी. यासाठी सुरू असलेले हातभट्टी दारूचे दुकान बंद करून व साहित्य जाळून खाक केले आहे. महिला बचत गटाचा दणका अवैध दारूभट्टी दारूवाल्यांना बसल्याने चांगलेच धास्तावले आहे.








