Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खाकी वर्दीच्या आड माणुसकीचा चेहरा: म्हसावद पोलीसांच्या तत्परतेमुळे महिला कुटुंबीयांच्या ताब्यात सुखरुप

team by team
January 31, 2023
in क्राईम
0
खाकी वर्दीच्या आड माणुसकीचा चेहरा:  म्हसावद पोलीसांच्या तत्परतेमुळे महिला कुटुंबीयांच्या ताब्यात सुखरुप

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्थेसोबत सामाजिक बांधीलकी देखील जपत आहेत. पोलीस व जनता यांच्यातील संबंध वृध्दींगत व्हावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील असतात. सामाजिक बांधीलकीची प्रचिती एका कुटुंबीयांना अनुभवायला मिळाली आहे.

 

 

29 जानेवारी रोजी रात्री 9.30 वा. सुमारास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना एका गावाचे पोलीस पाटील यांनी दुरध्वनीद्वारे कळविले की, खेतिया ते शहादा रोडवर रायखेड गावाजवळ एक अनोळखी महिला मिळून आली असून ती काहीच बोलत नाही. त्यावरुन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना कळवून तात्काळ त्याठिकाणी पाठवून घटनेबाबत संपूर्ण माहिती घेण्याबाबत सांगितले.

 

 

म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी खेतिया ते शहादा रोडवर त्या महिलेचा शोध घेतला असता ती महिला मिळून आली त्या महिलेस तिचे नाव गाव तसेच इतर माहिती विचारली असता परंतु तिचे बोलणे अस्पष्ट असल्यामुळे पोलीसांना ते समजत नव्हते. सदर घटनेबाबत म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना कळविली असता त्यांनी सदर महिलेला पुढील औषधोपचाराकामी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दाखल करुन औषधोपचार करुन त्या महिलेची ओळख पटवून तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात सुखरुप देणेबाबत सांगितले.

 

 

म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी त्या महिलेला औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दाखल केले, परंतु तेथे देखील डॉक्टरांनी ती महिला मनोरुग्ण असल्याचे सांगितल्याने त्या महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी त्यांच्या अधिनस्त असलेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटलांना याबाबत समाजमाध्यमातून माहिती देवून सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले. तसेच सदरची महिला मिळून आल्यापासून दोन दिवसांचा कालावधी उलटला होता. तरी देखील त्या महिलेबाबत काहीच माहिती मिळून येत नव्हती.

 

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्याची सिमा लागून असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग किंवा अपहरण झालेल्या महिलांबाबत माहिती घेण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले. तरी देखील काहीच हाती काहीच येत नव्हते.

 

 

31 जानेवारी रोजी सदर महिलेला जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे डिस्चार्ज दिल्यानंतर म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार व त्यांच्या अंमलदारांनी सदर महिलेला आपुलकीने तिच्याबाबत विचारपूस केली असता तिने अडखळत तिच्या गावाचे नाव सांगितले. म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस पाटील व इतर नागरिकांना संपर्क साधला असता सदर महिला त्याच गावाची असून 29 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घरातून निघून गेल्याचे सांगितले.

 

 

पोलीसांनी तात्काळ त्या महिलेच्या कुटुंबीयांना म्हसावद पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. कुटुंबीयांनी त्या महिलेला पाहाताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. महिलेची ओळख पटल्यानंतर त्या महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी सुखरुप ताब्यात मिळाल्यानंतर त्या महिलेच्या वडिलांनी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचेसह म्हसावद पोलीसांचे आभार व्यक्त केले.

 

कायदा व सुव्यवस्था राखतांना नेहमीच रस्त्यावर चौकात उभे राहुन कारवाई किंवा लाठी उगारणाऱ्या पोलीस आपल्यांना पहायला मिळातो, परंतु खाकी वर्दीच्या आड असलेला एक माणुसकीचा चेहरा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवायला मिळालेला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची समाजाप्रती असलेली तळमळ, समाजिक बांधिलकी त्यांच्या कर्तृत्वाने आज पुन्हा एकदा सर्वांनी पाहावयाला मिळाली आहे.

 

सदरची कामगिरी lपोलीस अधीक्षक पी. आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, सहा. पोलीस उप निरीक्षक राजेंद्र चव्हाण, पोलीस हवालदार चंदन बजरंगे, जितेंद्र पाडवी, पोलीस नाईक घनश्याम सुर्यवंशी, महिला पोलीस अंमलदार वर्षा पानपाटील, संगिता गावीत, पल्लवी चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ढेकवद ते नंदूरबार रेल्वे क्रॉसिंग गेट 88 मार्गावरील वाहतूक या तारखेपर्यंत बंद

Next Post

सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय, आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

Next Post
सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय, आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय, आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add