नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी वन हक्क कायदा अंमलबजावणी व एम एस पी गॅरंटी कायदा या मागण्यांसाठी आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा यांच्यातर्फे नंदुरबार तहसील कार्यालयावर काल मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन सादर करण्यात आले.
आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायद्याचे अंमलबजावणी करताना ग्रामस्तरीय व हक्क समिती ग्रामसभा ठराव व जेष्ठ नागरिकांच्या जबाबदारी धरून दावेदारांना पात्र घोषित करा, दावेदारांना कसलेल्या जमिनीच्या सातबारा उतारे द्या, सर्व वनहक्क शेतकऱ्यांना पीक विमा द्या, गायरान व इतर पडीक जमिनीवरील कसनाऱ्याच्या हक्क मान्य करा, पेसा कायद्यातील आदिवासी विरोधी दुरुस्त्या थांबवून ग्रामसभा सक्षम करा ,मनरेगा अंतर्गत मागेल त्याला गावाजवळ कामे द्या, नवीन वन विधेयक 2019 त्वरित मागे घ्या ,दिल्ली येथे शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे,
शेती कचरा जाळण्याच्या कायदा रद्द करावा, विज बिल कायदा स्थगित करण्यात यावा, एम एस पी गॅरंटी कायदा तयार करा, आदिवासी शेतकऱ्यांना मागील दोन योजना अंतर्गत कर्जमाफी द्यावी ,ऊस तोडणी मजुरांच्या वेतनाच्या नवा करार करावा, रेशन थेट सबसिडी योजना मागे घ्या, अशा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय वर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला नेहरू चौक हाटदरवाजा, उडानपूल व तहसील कार्यालय असा मोर्चाचे काढण्यात आला. यावेळी संघटनेचे संघटक करणसिंग कोकणी ,सेक्रेटरी विक्रम गावित, अध्यक्ष लिलाबाई वळवी, उपाध्यक्ष जमुनाताई ठाकरे ,बाबुराव ठाकरे, काशिनाथ कोकणी मनोहर वळवी, मंगल वळवी, लालसिंग वसावे, किसन वळवी ,यशवंत चौरे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








