नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील हुकमाफळी गावालगतच्या नाल्यात पुरून ठेवलेले 2.50 लाखाचे अवैध सागवानी लाकूड वनविभागाने जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सहाय्यक वन संरक्षण प्रादेशिक व वन्यजीव यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून त्यांचे सह वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक , वनपरिक्षेत्र अधिकारी चिंचपाडा प्रादेशिक, सहाय्यक वन संरक्षण परिवेक्षाधिन, वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व वनक्षेत्र स्टाफ चिंचपाडा प्रादेशिक सह शासकीय वाहनाने हुकमाफळी गावालगत च्या महसुल भागातील नाल्यात जाऊन पहाणी केली असता नाल्यात नविन पीक पेरा केलेल्या ठिकाणी खोदून पाहिले असता मातीत साग लाकडे लपवलेली दिसली तरी JCB मशीन च्या साहाय्याने सदरची साग लाकडे काढून ट्रॅक्टर मध्ये भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून पावतीने जमा केले. जप्त माल साग गोल नग 12 घन मीटर 1.860 या मालाची बाजार भावानुसार अंदाजित किंमत 2 ते 2.5 लाख रूपये एवढी आहे.
सदर कार्यवाहीत धनंजय ग. पवार सहाय्यक वन संरक्षण प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, स्नेहल अवसरमल वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर प्रादेशिक, मंगेश चौधरी वनपरिक्षेत्र अधिकारी चिंचपाडा प्रादेशिक, गणेश मिसाळ सहाय्यक वन संरक्षण परिवेक्षाधिन , वनपरीक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक व वनपरीक्षेत्र स्टाफ चिंचपाडा प्रादेशिक वाहन चालक विभांदिक यांनी सहभाग घेतला.
सदर कार्यवाही ही कृष्णा भवर उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार , संजय पाटील यांच्या विभागिय वनाधिकारी दक्षता पथक धुळे, धनंजय ग.पवार सहाय्यक वन संरक्षण प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .
वनक्षेत्रपाल नवापुर प्रा.नंदुरबार वनविभाग नंदुरबार यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा.








