Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील २ हजार ९१ घरकुलांना मंजुरी, शहरी रहिवाशांना मिळणार हक्काचे घर ; खा.डॉ.हीना गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
August 28, 2021
in राज्य
0
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील २ हजार ९१ घरकुलांना मंजुरी, शहरी रहिवाशांना मिळणार हक्काचे घर ; खा.डॉ.हीना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या (शहरी) माध्यमातून प्रत्येक बेघर व्यक्तीला त्याच हक्काच घर मिळाले पाहीजे यासाठी खा.डॉ.हीना गावित यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत केंद्र सरकारने नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील २ हजार ९१ घरकुलांच्या आराखड्याला मंजुरी दिली असल्याचे खा.डॉ.हीना गावित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले आहे.

नंदुरबार लोकसभा मतदार संघात शहरातील रहिवासी असणाऱ्या अनेकांना  स्वत:च्या हक्काचे घर नाही.यामुळे खा.डॉ. हीना गावीत यांनी प्रत्येक नगरपालिकेतील शहरी भागातील गोर गरीबांना घरकुल मिळण्यासाठी पाठपुरावा केला.त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. डॉ. हीना गावित या जिल्हा सनियंत्रण (दिशा समिती) समितीच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी मतदार संघात असलेल्या सर्व नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. घरकुल मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये जे नागरिक सुटले असतील त्यांचे नव्याने अर्ज मागवून व त्यांना सदर आराखाड्यामध्ये समाविष्ठ करुन नविन आराखडा तयार करुन केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे.

मी सर्व गोर-गरीब जनतेला पण आवाहन करते की जे लोक घरकुल योजनेतुन सुटले असतील त्यांनी या योजने अंतर्गत घरकुलासाठी अर्ज करावे. जसे आता केंद्र सरकारकडुन पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर करुन आणले तसेच उर्वरीत घरकुल सुध्दा मंजुर करण्यात येतील. असे खा.डॉ.हीना गावित असे सांगितले.

मंजुर झालेल्या घरकुलांची नगरपालिकानिहाय संख्या

नंदुरबार नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यात २५० व दुसऱ्या टप्प्यात १०५ घरकुले.

नवापुर नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यात ३९ व दुसऱ्या टप्प्यात १०० घरकुले.

शहादा नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यात १५० व दुसऱ्या टप्प्यात २५५ घरकुले

 धडगांव नगरपंचायतमधील ३५० घरकुले

तळोदा नगरपालिकेतील ३०० घरकुले.

शिरपुर नगरपालिकेतील पहिल्या टप्प्यात १०० व दुसऱ्या टप्प्यात ४०० घरकुले.

साक्री नगरपालिकेतील ४२ घरकुले मंजूर करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन

Next Post

जमावाची दोघांना मारहाण, पोलीसांनी केली सात जणांना अटक

Next Post
जमावाची दोघांना मारहाण, पोलीसांनी केली  सात जणांना अटक

जमावाची दोघांना मारहाण, पोलीसांनी केली सात जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group