नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुका प्रशासन आयोजित आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने नुकतेच व्याख्यान संपन्न झाले.
याप्रसंगी तहसीलदार मंदार कुलकर्णी निवासी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी, नायब तहसीलदार सुरेखा जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ हे उपस्थित होते.
शासकीय व प्रशासकीय स्तरावर सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी माहिती अधिकार कायदा सकारात्मक वापरल्यास नक्कीच जनतेचा फायदा होतो परंतु त्यात देखील नैतिकता असणे गरजेचे आहे. फक्त पैसे कमवण्याचा मार्ग म्हणजे हा कायदा असे कृत्य करणे हा देखील गुन्हा असल्याचे नमूद केले म्हणून प्रामाणिकपणे व नैतिकतेने या कायद्याचा वापर व्हावा असे प्रतिपादन सार्वजनिक मराठी हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथील ग्रंथपाल नीलिमा माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना माहिती अधिकारा कायद्याची संहिता संक्षिप्त स्वरूपात मांडली. याप्रसंगी नवापूर तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी व नवापूर पोलीस प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवापूर तालुका प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.









