Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दुसऱ्या दिवशीही दणका

team by team
September 29, 2022
in क्राईम
0
गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका
नंदूरबार  l  प्रतिनिधी
गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दुसऱ्या दिवशीही दणका दिला असून 53 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022 रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. नवरीत्सवाच्या अनुषंगाने मंदिर व यात्रौत्सव दरम्यान गर्दीच्या मुलींची किंवा महीलांची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असतात त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व मालदार यांचे एक दामिनी पथक तयार करुन टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुद्ध कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे- 17. उपनगर पोलीस ठाणे-  5, नवापूर पोलीस ठाणे- 10, शहादा पोलीस ठाणे- 8. धडगांव पोलीस ठाणे- 2, म्हसावद पोलीस ठाणे- 2. सारंगखेडा पोलीस ठाणे- 2, अक्कलकुवा पोलीस ठाणे-5, मोलगी पोलीस ठाणे- 2 एकुण 53 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे  26 सप्टेंबर 2022 रोजी देखील 21 मुलीची छेडछाड करणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात आली होती.
तसेच सदर युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. तसेच पुन्हा त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केलं तर त्याचेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नवरात्रोत्सव दरम्यान जिल्हयातील वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले जात असून त्या ठिकाणी असणाऱ्या टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून अशा टवाळखोर युवकांविरुद्ध कारवाई करण्याबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. सदरची मोहिम नवरात्रौत्सवा दरम्यान अजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून त्यांना परावृत्त करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील यांनी सर्व पालकांना केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

व्यापाऱ्याची लुटमार करणारा सराईत आरोपीस अटक

Next Post

वीज कोसळून १६ बकर्‍या जागीच मृत्यूमुखी, दोघे जण बचावले

Next Post
वीज कोसळून १६ बकर्‍या जागीच मृत्यूमुखी, दोघे जण बचावले

वीज कोसळून १६ बकर्‍या जागीच मृत्यूमुखी, दोघे जण बचावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add