Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्यापाऱ्याची लुटमार करणारा सराईत आरोपीस अटक

team by team
September 28, 2022
in क्राईम
0
हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

नंदूरबार l प्रतिनिधी


नंदूरबार येथील व्यापाऱ्याची लुटमार करणारा सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीपभाई रशिदभाई नाईक रा. कृष्णा विहार, नंदुरबार हे दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील तुप बाजार परीसरातील त्याचं ऑफिस मधील दैनंदिन व्यवहाराचे एकूण 95 हजार रुपये रक्कम ऑफीस बंद करुन त्यांच्या मुलाच्या शाळेच्या बॅगेत ठेवून त्यांच्यासह मोटार सायकलीने घराकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळस उपनगरातील कृष्णा नगर येथील राजेंद्र पाटील यांचे श्रीपाद नावाच्या बंगल्यासमोर एक बिना नंबरच्या मोटार सायकलवरील 3 अनोळखी इसमांनी दिलीपभाई नाईक मोटार सायकलीच्या पुढे त्यांची मोटार सायकल आडवी लावून दिलीपभाई नाईक यांचे डोळयात मिरची पुड भिरकावून शाळेची बॅग व त्यातील 95 हजार रुपये हे जबरीने हिसकावुन पळून गेले.

 

 

 

त्यानंतर दिलीपभाई रशिदभाई नाईक यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 392, 341, 34 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे हे घटनास्थळी रवाना झाले. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ जिल्ह्यातील तसेच धुळे जिल्ह्यातील नंदुरबारलगत असलेल्या पोलीस ठाण्यांना देखील नाकाबंदी करण्याबाबत सांगितले.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व उपनगर पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत आदेशीत केले. स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलीस ठाण्याचे पथकाने फिर्यादी यांचे ऑफीस व घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी. सी.टी.व्ही.तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला,

 

 

 

परंतु आरोपीतांनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळे व दुचाकीला नंबर नसल्यामुळे आरोपीतांची निश्चित ओळख होत नव्हती. 27 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मागील महिन्यात व्यापा-याचे पैसे लुटणारा हा धुळे शहरातील सराईत आरोपी खुशाल उर्फ मनोज मोकळ हा असून त्याने त्याचे इतर दोन साथीदार यांचे मदतीने व्यापा-याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून जबरीने पैसे लुटले आहेत. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कळवून संशयीत आरोपी खुशाल उर्फ मनोज मोकळ व या साथीदारांना ताब्यात घेवून माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविद्र कळमकर यांनी त्यांचे तात्काळ एक पथक तयार करून धुळे येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ, रा. दंडेवाला बाबा नगर, मोहाडी, धुळे यास धुळे येथील बस स्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार येथे आणून गुन्हयाबाबत विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता खुशाल उर्फ मनोज मोकळ याचा धुळे येथील मित्र शंकर रेड्डी व त्याचा मेहुणा योगेश रा. सुरत याने नंदुरबार येथील ऑफिसची माहिती पुरविल्याने त्याने त्याचे इतर दोन साथीदार मुझाहिद खाटीक, सलीम यांच्या मदतीने दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी तुप बाजार, तांबोळी गल्ली, नंदुरबार येथील एका इसमाचा पाठलाग करून एका कॉलनीत सदर इसमाच्या मोटार सायकल समोर गाडी आडवी लावून त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याचेकडील पैश्यांची असलेली बॅग पळवून नेली बाबत खुशाल उर्फ मनोज मोकळ याने सविस्तर सांगितली.

 

 

खुशाल उर्फ मनोज मोकळ याचे मुस्लीम कब्रस्तान जवळ, धुळे व खुशाल मोकळ यास माहिती देणारे त्याचे दोन मित्र शंकर रेड्डी, योगेश यांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करून सुरत व धुळे येथे रवाना करण्यात आले असून लवकरच त्यांना देखील बेड्या ठोकण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले. खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ याच्यावर यापूर्वी धुळे, जळगांव, नाशिक येथे जबरी चोरीचे 17 गुन्हे दाखल असून त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे. तसेच खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ व त्याच्या साथीदारांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का ? याबाबत तपास करीत आहोत.
सदरची कामगिरी ही नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक राकेश मोरे, सुनिल पाडवी, मोहन तमढेरे, पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत, आनंदा मराठे, विजय धिवरे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव सहभाग

Next Post

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दुसऱ्या दिवशीही दणका

Next Post
गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दणका

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नंदुरबार पोलीसांचा दुसऱ्या दिवशीही दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add