नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के. सी.पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात तसेच जिल्हाभरात गरजू पात्र आदिवासी कुटूंबांना कोरोनाकाळात आदिवासी विकास विभागातर्फे खावटी अनुदान वाटप करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने तिसी व नगाव ता. नंदुरबार येथे कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करुन खावटी अनुदान वाटप करण्यात आले.
यावेळी कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आदिवासी विकास योजनेची माहिती देऊन, लाभ घेण्याचे आवाहन केले.आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आदिवासी विकासामार्फत विविध योजना नविन सुरू केल्या आहेत.त्यात आदिवासी कुटूंबांना शासनातर्फे शबरी घरकूल योजनेअंतर्गत घरे बांधून देण्याचा तसेच भुमिहिन आदिवासी कुटूंबांना शेती योग्य जमिन वाटप करण्यात येणार आहे.तसेच गावराणी कोंबडी पालन,शेळीपालन यासाठी पात्र आदिवासी बांधवांना लाभ मिळणार आहे.
आदिवासी बांधवांनी तसेच सर्व समाज घटकांनी शिक्षण व व्यसनमुक्ती यावर लक्ष केंद्रीत करुन जिवनमान सुधारावे यासाठी सर्वांनी आदिवासी योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन कार्याध्यक्ष नाईक यांनी केले. यावेळी खोंडामळी गटाचे कॉंग्रेसचे नेते राजेंद्र पाटील यांनी आभार व्यक्त करतांना सांगीतले की,आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री असल्याने त्यांनी विकास कामांची जोरदार सुरुवात झाली आहे. आदिवासी विकासामार्फत विकासासाठी अनेक लाभदायी योजना आणल्या आहेत आपण त्याचा लाभ घ्यावा. यावेळी शिंदगव्हाण येथील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास पाटील. युवराज पाटील . दाजभाऊ पवार,किशोर पाटील, ॲड.राहूल पाटील,
नगाव येथील सरपंच रत्नाबाई अधिकार धनगर, माजी सरपंच युवराज पाटील, रोहिदास ठाकरे, पोलीस पाटील प्रशांत पाटील, ग्रामविकास अधिकारी भरत निकुंबे, तलाठी अतुलकुमार पवार, नाना ठाकरे, हर्षल पाटील, गुलाब पाटील, दिपक मगरे, प्रशांत देसले, दिपक पाटील, प्रफुल्ल चौधरी, धारप भोये
तसेच आदिवासी विभागाचे कर्मचारी,तिसी व नगाव येथील लाभार्थी तसेच सरपंच, उपसरपंच,कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थीत होते.सुत्रसंचलन पाटील यांनी केले.यावेळी नगाव येथील ४१ लाभार्थ्यांना खावटी किट वाटप करण्यात आली.