नंदूरबार l प्रतिनिधी
सातपुड्यातील आदिवासी समाजातील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे याने पुन्हा ऐतिहासिक कामगिरी केली असून माउंट सतोपंथ (7075 मी) हे २३२१२ फूट उंचीचे शिखर सर करत १७ हजार फूट उंचीवर तिरंगा फडकवला.
सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालूक्यातील ‘बालाघाट’ या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे यांने कोरोना काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एलब्रूस’ सर करून विश्वविक्रम केला होता. कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे हा भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला होता.
अनिल वसावे यांनी 2021 मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम होती. 26 जानेवारी 2021 रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे शिखर सर केले होते. येणाऱ्या काळात 7 ही खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा मानस आहे, असे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी सांगितले.
दरम्यान काल दि. 23 अगस्त रोजी हिमालयाच्या गढवाल श्रेणीतील प्रमुख शिखरांपैकी एक आहे जे भारतीय उपखंडात येते आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यानातील दुसरे सर्वोच्च शिखर माउंट सतोपंथ (7075 मी) हे सर केले.
हि मोहिम दि .१० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२२ अशी असून हे शिखर सर करण्यासाठी त्यांनी ७०७५ मीटर म्हंनजे जवळ जवळ .२३२१२ फूट एवढी उंच असलेल्या माउंट सतोपंथ या शिखरावर खराब हवामान असताना ही सर केले.जागतिक आदिवासी दिना निमित्त व अशी विशेष कामगिरी करून आजादी का अमृत मोहिमेस्तव हि मोहीम आखली आहे. विशेष म्हणजे अनिल वसावे पहिल्यांदा एवढा उंच शिखर सर करण्यासाठी गेले होते. यासाठी त्यांना प्रचंड मोठी मेहनत करावी लागली.या मोहिमेसाठी नवापूर भाजपा तालुका अध्यक्ष माजी जि. प. अध्यक्ष भरत गावीत यांनी सहकार्य केले.