नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मंगळबाजारात मारमारी करतांना आढळून आल्याने दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मंगळबाजारमधील अमृत चौकात सागर माळी व सुरज चौधरी हे मारहाण करत असतांना व आपसात झोंबाझोबी करीत असतांना मिळून आल्याने पोशि अफसर गफ्फार शहा यांच्या फिर्यादीवरून
नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सागर संतोष माळी रा.मोठामाळीवाडा (नंदुरबार) सुरज हिरालाल चौधरी रा.चौधरीगल्ली नंदुरबार यांच्या विरूध्द भादंवि कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हे.कॉ.अतुल बिर्हाडे करीत आहेत.