नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे एका २७ वर्षीय महिलेशी जवळीक साधून शरीर सुखाची मागणी करुन त्रास दिल्याने संबंधित महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील वावी येथील १९ वर्षीय रंजित जत्र्या ठाकरे व एक अनोळखी इसमाने खडक्या येथील एका २७ वर्षीय महिलेशी जवळीक साधून शरीर सुखाची मागणी केली.
महिलेने यास अनेकदा विरोध दर्शविला. सदर महिलेला एक अनोळखी इसमाच्या मदतीने मोटारसायकलवर बसवून नेत रंजित ठाकरे याने त्रास दिल्याने संबंधित महिलेने त्रासाला कंटाळून ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबत महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित रंजित ठाकरे व एक अनोळखी इसमाविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०६, (३४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डी.के.महाजन करीत आहेत.