Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

१५ ऑगस्टपूर्वी समन्वयातून प्रश्न न सुटल्यास प्रसंगी आंदोलन उभारू : पुरुषोत्तम काळे

team by team
August 2, 2022
in राज्य
0
१५ ऑगस्टपूर्वी समन्वयातून प्रश्न न सुटल्यास प्रसंगी आंदोलन उभारू : पुरुषोत्तम काळे

नंदुरबार l प्रतिनिधी

शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक परिषदेतर्फे प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे, परंतु सदर विषयांना दिरंगाई होत असल्याने व जिल्ह्यातील शिक्षक याबाबत सातत्याने आग्रही असून १५ ऑगस्ट पूर्वी या सर्व प्रश्नांना न्याय न मिळाल्यास प्रसंगी शिक्षक परिषदेतर्फे तीव्र आंदोलन उभारू, असे प्रतिपादन राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी केले आहे तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात झालेल्या शिक्षक संपर्क मेळाव्यात ते बोलत होते.

 

काळे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न व समस्या जाणून घेण्यासाठी तालुकास्तरावर संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून तळोदा येथील मेळाव्यात मोठ्या संख्येने शिक्षकांनी उपस्थिती देऊन विविध समस्या मांडल्या. त्यात जिल्हा कार्यालयात जमा असलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीच्या ६३२ प्रस्तावांना तात्काळ मंजुरी द्या, झेडपीएफएमएसच्या प्रभावी अंमलबजावणी करून दरमहा १ तारखेला वेतन द्या,

 

बदलीपूर्वी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करा, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता त्वरित वितरित करावा, निवड श्रेणीच्या दुसर्‍या टप्प्यातील पात्र शिक्षकांच्या प्रस्तावांना मंजुरी द्या, सेवा पुस्तकाच्या नोंदींच्या कॅम्पचे आयोजन व्हावे, भविष्य निर्वाह निधीच्या दोन वर्षापासूनच्या हिशोबाच्या पावत्या अप्राप्त असून त्या अचूक मिळाव्यात, मयत शिक्षकांचे सानुग्रह अनुदानाचे प्रस्तावांना तात्काळ शिफारस करून पुढे प्रस्तावित करावे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक परिषदेतर्फे प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधून चर्चा करण्यात येत आहे.

 

शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात सातत्याने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन चर्चा केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीची मागणी शिक्षक परिषदेने लावून धरली आहे. लवकरच प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी श्री.काळे म्हणाले. जिल्ह्याला नियमित शिक्षणाधिकारी प्राप्त झाल्याने शिक्षकांचे प्रश्न जलदगतीने निकाली निघावेत, अशा भावना तालुक्यातील शिक्षकांनी व्यक्त करून दाखवल्या. शिक्षक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रभावी संघटन निर्माण झाले असून शिक्षकांचे अनेक प्रश्न निकाली लागत असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.

 

भविष्य निर्वाह निधीच्या हिशेबात ताळमेळ बसत नसून दरवर्षी अचूक व नियमित स्लिप मिळणेबाबत व भविष्य निर्वाह निधी स्लिप ऑनलाईन मिळाव्यात, जिल्हा कार्यालयाने मंजूर केलेल्या वैद्यकीय बिलाचा लाभ पंचायत समितीने तात्काळ द्यावा, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासकीय स्तरावरून संतगतीने काम सुरू असल्याचे शिक्षकांनी सांगून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली.

 

विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय सदस्य आबा बच्छाव, जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे, जिल्हा संघटनमंत्री प्रकाश बोरसे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर जिल्हा कार्यवाह किरण घरटे, सहकार्यवाह अशोक बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश मोरे, सहकार्यवाह किशोर ठाकरे, भगवान मोरे, कार्यालयीन मंत्री जगदीश पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोजकुमार चौधरी, तळोदा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब बावा, शहादा तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बैसाणे, वंदना न्हावडे, लक्ष्मी देवरे, रंजना निकुंभे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन रणधीर भामरे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी तळोदा कोषाध्यक्ष यादवेद्र भामरे, तालुका संघटक चुनिलाल पाडवी, कार्यकारिणी सदस्य रतिलाल पावरा, सोनल बोरसे, मधुकर नागरे, जेष्ठ सल्लागार जयवंत वळवी, गोमा पावरा, मगन पाडवी आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबारसह आठ जिल्ह्यासाठी भारतीय लष्कराच्या भरतीसाठी 3 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

अन्न प्रक्रिया उद्योग व उद्योजकता प्रशिक्षणाचा समारोप

Next Post
अन्न प्रक्रिया उद्योग व उद्योजकता प्रशिक्षणाचा समारोप

अन्न प्रक्रिया उद्योग व उद्योजकता प्रशिक्षणाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add