Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हॉटेलमधुन ३५ बिअरचे बॉक्स चोरणार्‍या दोघांना अटक, दोन जण फरार, मुद्देमालासह चारचाकी जप्त

team by team
August 14, 2021
in क्राईम
0
हॉटेलमधुन ३५ बिअरचे बॉक्स चोरणार्‍या दोघांना अटक, दोन जण फरार, मुद्देमालासह चारचाकी जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील कात्री गावातील हॉटेलचे शटरचे कुलूप तोडून ८४ हजार ९६९ रुपये किंमतीचे ३५ बिअरचे बॉक्स चोरुन नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघांना अटक केली असुन,मुद्देमालासह ३ लाख रुपये किमंतीची बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे. उर्वरीत २ आरोपी फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१० ते दि. ११ ऑगस्ट दरम्यान धडगांव तालुक्यातील कात्री गावातील हॉटेल हितेश परमिट रुमच्या शटरचे कुलूप तोडून ८४ हजार ९६९ रुपये किंमतीचे ३५ बिअरचे बॉक्स चोरुन नेल्याने हॉटेल मॅनेजर सामसिंग सेमटया बळवी यांच्या फिर्यादीवरुन धडगांव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .दि.१२ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मोलगी येथील एका इसमाकडे बियरचे काही बॉक्स आहेत अशी बातमी मिळाल्यावरून रतिलाल राड्या पाडवी रा . मोलगी ता अक्कलकुवा यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने इतर ३ इसमांसह चोरी केल्याची कबुली दिली त्यावरुन रतिलाल राड्या पाडवी रा . मोलगी ता अक्कलकुवा, गणेश अमरसिंग वसावे रा . पाटीलपाडा, मोलगी यांना अटक करुन त्यांचकडून १२ हजार ७५० रुपये किमतीचे कांगारू प्रिमीयम बियरचे ५०० एम एल , टीनचे ६ बॉक्स व गुन्ह्यात वापरलेले ३ लाख रुपये किमंतीची बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे . उर्वरीत २ आरोपीतांचा शोध घेवून उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम चालू असुन दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी धडगांव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षकमहेंद्र पंडित , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप – अधीक्षक ( गृह ) देवराम गवळी , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव , विकास कापुरे , किरण मोरे , अभिमन्यु गावीत यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक ,महेंद्र पंडित यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आझादी का अमृतमहोत्सवी वर्षी एक राखी सैनिकांसाठी

Next Post

शाळा आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार करावे-ॲड.के.सी.पाडवी

Next Post
शाळा आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार करावे-ॲड.के.सी.पाडवी

शाळा आणि अंगणवाड्यांचे बांधकाम दर्जेदार करावे-ॲड.के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add